महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'महा'चक्रीवादळ : ६ नोव्हेंबरला जोरदार पावसाची शक्यता; राज्य सरकारकडून इशारा - #ICG

'महा' या चक्रीवादळामुळे ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रायगडमध्ये ८ नोव्हेंबरला मुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे.

'महा'चक्रीवादळ

By

Published : Nov 4, 2019, 11:10 AM IST

मुंबई - राज्य सरकारने उत्तर कोकण आणि राज्यातील उत्तर-मध्य भागात येणाऱ्या जिल्ह्यांना जोरदार गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 'महा' या चक्रीवादळामुळे ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रायगडमध्ये ८ नोव्हेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रविवारी भारतीय तटरक्षक दलाने ७ जहाजे आणि २ विमाने गुजरातच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱया बोटींना जवळच्या किनाऱ्यावर परतण्याची सूचना देण्यासाठी तैनात केली होती. 'महा'चक्रीवादळाची शक्यता असल्याने ही काळजी घेण्यात येत आहे. या आशयाचे ट्विटदेखील तटरक्षक दलाने केले आहे.

भारतीय हवामान खात्याने अत्यंत भयानक चक्रीवादळ 'महा' पूर्व-मध्य अरबी समुद्रात आल्याची सूचना दिली होती. हे वादळ सध्या पश्चिमेकडे सरकत आहे. तसेच, रविवारी दुपारी २.३० नंतर याची तीव्रता वाढली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रातून ते अंदाजे ५९० किलोमीटर पश्चिम-आग्नेयेकडे गुजरातमधील वेरावलच्या दिशेने निघाले आहे. या वादळाचा महाराष्ट्र, गुजरातसह मध्य प्रदेशलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details