महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'हे' तर टिकटॉक सारखे पाकिस्तानी अ‌ॅप; चुकूनही करू नका डाऊनलोड

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिकटॉक या अ‌ॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर टिकटॉकवर बहिष्कार घालून स्वदेशी अ‌ॅप म्हणून 'मित्रो' नावाचे नवे अ‌ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, तुम्ही असे पाऊल उचलत असाल तर सावध व्हा....

mitron app
'हे' तर टिकटॉक सारखे पाकिस्तानी अॅप

By

Published : Jun 4, 2020, 6:28 PM IST

मुंबई - भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिकटॉक या अ‌ॅपपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर टिकटॉकवर बहिष्कार घालून स्वदेशी अ‌ॅप म्हणून 'मित्रो' नावाचे नवे अ‌ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, तुम्ही असे पाऊल उचलत असाल तर सावध व्हा...

'हे' तर टिकटॉक सारखे पाकिस्तानी अ‌ॅप

मित्रो अ‌ॅप डाऊनलोड केल्यावर ते वापरात आणण्यासाठी तुमच्या मोबाइल फोनचा अ‌ॅक्सेस (access ) मागण्यात येतो. यामधून युजरच्या फोन प्रोफाइलची सर्व माहिती कोणीही चोरू शकते. भविष्यात त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. हा संभाव्य धोका विशेष करून हॅकर्स व सायबर गुन्हेगारांकडून जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अ‌ॅप डाऊनलोड करताना सावधान राहा.

सध्या इंटरनेटवर करमणुकीचे व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक अ‌ॅप उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने टिकटॉकचा वापर सर्वाधिक होतो. भारतात कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर चायनीज गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली. यामुळे टिकटॉक सारख्या चायनीज अ‌ॅपपेक्षा भारतीय बनावटीचे अप‌ॅ वापरण्याची मागणी होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर मित्रो अ‌ॅपचा उदय झाला. सध्या अनेक लोक त्याला पसंती देत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात बहुतांश नागरिक घरीच असल्याने करमणुकीसाठी हे अ‌ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात आले. मात्र, संबंधित अ‌ॅपचा वापर करणाऱ्यांनी मित्रो अ‌ॅप डाऊनलोड करताना विचार करावा, असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.

काय आहेत त्रुटी; का नाही सुरक्षित?

तांत्रिकदृष्ट्या मोबाइलमधील युजर प्रायव्हसीच्या (user privacy) बाबतीत हे अ‌ॅप अगदीच कुचकामी ठरत असून या अ‌ॅपची कोणतेही गोपनीयता धोरण (privacy policy) नसल्याचे समोर आले आहे.यामुळे संबंधित अ‌ॅपचा कोणीही गैरवापर करू शकतो. मित्रो अ‌ॅपच्या मालकीबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच एका पाकिस्तानी कंपनीने याची निर्मिती केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या अ‌ॅपचा वापर टाळणे हितकारक असल्याचे सायबर विभागाने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details