महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखडेंनी रोखलं, नवाब मलिकांचा आरोप - who is kashif khan

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि क्रूझ पार्टी आयोजक काशिफ खान यांची घनिष्ट मैत्री आहे. त्यामुळे काशिफ खानवर कारवाई केली जात नाही, असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनी केला आहे.

Cruise ship rave party organiser friend of Sameer Wankhede: Malik
काशिफ खानवर कारवाई करण्यापासून समीर वानखडेंनी रोखलं, नवाब मलिकांचा आरोप

By

Published : Oct 29, 2021, 2:12 PM IST

मुंबई - कार्डिलिया क्रूजवर केलेली कारवाई हा केवळ बनाव होता. काही लोकांचे फोटो एनसीपीकडे होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. क्रूजवर पार्टीचे आयोजन काशिफ खान यांनी केलं. काशीम खान हा फॅशन टीव्हीचा हेड असून काशिफ आणि समीर वानखडे यांची मैत्री असल्याने क्रूजवर असूनही समीर वानखडेने काशिफ खान यांच्यावर कारवाई केली नाही. फॅशन शोच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणे आणि ड्रग्सचा व्यापार काशिफ करतो. क्रूजवर उपस्थित असतानाही काशीस खानवर जाणून-बुजून समीर वानखेडे यांनी कारवाई केली नसल्याचा धक्कादायक आरोप अल्पसंख्यांक मंत्रीनवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेतून केला आहे.

मी पण मराठीच आहे, वानखेडे कुटुंब याबाबत मी कधीही बोललो नाही -

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठी मुलीला त्रास होत असल्याचं सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ ही मागितली होती. मात्र, मी देखील मराठीच आहे. माझा जन्मही महाराष्ट्रातच झाला, असं म्हणत मराठी मुद्द्याचं खंडन नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला. तसेच समीर वानखेडे भारतीय जनता पक्षाची हातमिळवणी करून महाराष्ट्राची अस्मिता घालण्याचा प्रयत्न करत आहेत. याकडेही लक्ष द्यायला पाहिजे, असं म्हणत क्रांती रेडकर यांना नवाब मलिकांनी टोला लगावला आहे. तसेच वानखडे कुटुंबीयाच्या सदस्यांबाबत मी कधीही कोणता आरोप केलेला नाही. त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो देखील त्यांच्या इच्छेनं मी ट्विट केला, असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून देण्यात आले.

चीफ विजिलंस कमिश्नरच्या गाईडलाईन्सनुसार कारवाई करा -

नवाब मलिक यांना आलेले निवानी पत्र त्यांनी एनसीबीच्या कार्यालयाला पाठवले आहे. तसेच या पत्रामध्ये नमूद केलेल्या 26 केस संदर्भात चीफ विजिलंस कमिश्नरच्या गाईडलाईन्सनुसार कारवाई करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. या पत्रात 22 नंबर च्या केसमध्ये असलेल्या पंचाने देखील आपल्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतली असल्याची तक्रार पोलिसांकडे केली असल्याचे यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे चौकशीची मागणी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांना आलेले निवानी पत्र त्यांनी एनसीबीच्या कार्यालयाला पाठवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details