महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात 1.6 टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ

नॅशनल क्राईम रिपोर्टच्या 2019 चा अहवाल प्रकाशित झालेला असून 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये देशात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 1.6 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे समोर आलेला आहे. 2019 या वर्षी देशात तब्बल 51 लाख 56 हजार 172 गुन्हे नोंदविण्यात आले असून हेच प्रमाण 2018 मध्ये 50 लाख 74 हजार 635 एवढे होते.

नॅशनल क्राईम रिपोर्ट अपडेट
एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात 1.6 टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ

By

Published : May 8, 2021, 2:35 PM IST

Updated : May 8, 2021, 7:33 PM IST

मुंबई - नॅशनल क्राईम रिपोर्टच्या 2019 चा अहवाल प्रकाशित झालेला असून 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये देशात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आलेला आहे. 2019 या वर्षी देशात तब्बल 51 लाख 56 हजार 172 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर हेच प्रमाण 2018 मध्ये 50 लाख 74 हजार 635 एवढे होते. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 1.6 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे समोर आलेला आहे. देशात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भातील आढावा या विशेष रिपोर्ट मध्ये घेतला आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात 1.6 टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ

खून -

2019 या वर्षामध्ये देशभरात तब्बल 28918 खुनाचे गुन्हे घडले आहेत. 2018 च्या तुलनेत यामध्ये 0.3 टक्क्यांची घट आली आहे. 2018 मध्ये देशभरात 29017 गुन्हे घडले होते.

अपहरण -

2019 या वर्षामध्ये अपहरणाचे तब्बल 1 लाख 5 हजार 37 गुन्हे घडले असून यामध्ये 2018 च्या तुलनेत 0.7 टक्क्यांची घट आलेली आहे. 2018 या वर्षामध्ये देशभरात तब्बल 1 लाख 5 हजार 734 गुन्हे घडले होते.

महिलांवरील गुन्हे -

महिलांच्या विरोधात घडणार्‍या गुन्ह्यांची नोंद 2019 मध्ये तब्बल 4 लाख 5 हजार 861 आहेत. तर 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. तब्बल 7.3 टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आलेली असून 2018 मध्ये महिलांवरील गुन्हे हे 3 लाख 78 हजार 236 एवढे होते.

अल्पवयीन मुलांवरील अत्याचार -

अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांच्या संदर्भात 2019 मध्ये 1 लाख 48 हजार 185 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 4.5 टक्क्यांची वाढ झालेली आहे. 2018 मध्ये अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांचे 1 लाख 41 हजार 764 गुन्हे नोंदविण्यात आले होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील गुन्हे -

2019 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात घडणार्‍या गुन्ह्यांची संख्या ही 27696 एवढी नोंदविण्यात आलेली आहे. यामध्ये 13.7 टक्क्यांची वाढ झालेली असून 2018 मध्ये हेच प्रमाण 24349 एवढे होते.

शेड्यूल्ड कास्ट एट्रोसिटी गुन्हे -

शेड्युल कास्ट संदर्भात ॲट्रॉसिटीचे गुन्हे सुद्धा नोंदविण्यात आलेले असून 2019 मध्ये तब्बल 45935 गुन्हे देशभरात नोंदविण्यात आलेले होते. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये तब्बल 7.3 टक्क्यांची वाढ झालेली असून 2018 मध्ये तब्बल 42 हजार 793 गुन्हे नोंदविण्यात आले होते.

न्यायालयात दाखल गुन्हे व दोष सिद्धी

  • खून -2019 या वर्षामध्ये देशभरात तब्बल 48553 खुनाच्या संदर्भात तपास करण्यात आला होता. यामध्ये 85 टक्के प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले असून 2 लाख 24 हजार 747 प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयात पाठविण्यात आलेली होती. यामध्ये 6961 प्रकरणांमध्ये आरोपीना दोषी सिद्ध झालेली आहे.
  • बलात्कार - या संदर्भात देशभरात 45536 गुन्हे नोंदविण्यात आले होते. ज्यामध्ये 81.3 टक्के प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले असून 1 लाख 62 हजार 741 याचिका या न्यायालयामध्ये सुनावणीसाठी दाखल करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये 4640 प्रकरणांमध्ये दोषी सिद्ध झालेली आहे.
  • अपहरण -1 लाख 73 हजार 245 प्रकरणांचा तपास करण्यात आलेला होता. ज्यामध्ये 37.3 टक्के प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयामध्ये 2 लाख 45 हजार 914 याचिका याप्रकरणी पाठवण्यात आले असता 3952 प्रकरणांमध्ये दोषी सिद्ध झालेली आहे.
  • दंगल -दंगलीच्या संदर्भात 79004 प्रकरणांमध्ये तपास करण्यात आला होता. ज्यामध्ये 86.8 टक्के प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेला होतं. तब्बल 5 लाख 6 हजार 152 प्रकरणे न्यायालयात सुनावणीसाठी गेली असून यासंदर्भात 5207 प्रकरणांमध्ये दोष सिद्धी झालेली आहे.
  • जखमी करणे /एसिड अटॅक - जखमी करण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल 7 लाख 2640 प्रकरणांमध्ये तपास करण्यात आला होता. ज्यामध्ये 27.6 टक्के प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होत. तब्बल 26 लाख 66 हजार 893 प्रकरणे न्यायालयात सुनावणीसाठी गेलेले असून 61243 प्रकरणांमध्ये दोष सिद्धी झालेली आहे.

हेही वाचा - लॉकडाऊनच्या धसक्याने सोलापुरात खरेदीसाठी तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Last Updated : May 8, 2021, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details