मुंबई- सोनू जलान या बुकीकडून परमबीर सिंग, राजकुमार कोथमिरे, प्रदीप शर्मा यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सोनू जलान याच्या सांगण्यानुसार परमबीर सिंग, राजकुमार कोथमिरे, प्रदीप शर्मा यांनी त्यांच्याकडून 3 कोटी 45 लाख रुपयांची वसूली केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणताही एफआयआर दाखल करण्यात आली नाही. यामुळे आता सोनू जलान यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी केली आहे. सोनू जलान यांच्या वकील आभा सिंग यांनी ललिता कुमारी जजमेंटचा हावाला देत या प्रकरणात डिस्क्रिट चौकशी सात दिवसांच्या आत करुन पुढील कार्यवाही केली जाते. मात्र अद्याप तसं कोणतही काम तपासयंत्रणांकडून झालं नाही. त्यामुळं आजून 3 दिवस थांबणार आहोत. जर एफआयआर दाखल झाली नाही, तर आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचे सांगितले. तसंच ठाणे एक्स्ट्रोशन सेलवर या पूर्वी देखील अनेक आरोप लागले आहे, असं आभा सिंग यांनी म्हटलं आहे.
सोनू जलान प्रकरणाबद्दल माहिती देताना.. काय म्हणाले सोनू जलान -
''माझी तक्रार परमबीर सिंग, राजकुमार कोथमिरे आणि प्रदीप शर्मा यांच्या विरोधात आहे. या तिघांनी मला धमकावलं, माझ्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला. माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपयांची खंडणी घेतली. अटकेत असताना मला परमबीर सिंग यांच्या दालनात नेण्यात आलं. तिकडे परमबीर सिंग यांनी माझ्याकडून 10 कोटी रुपयांची मागणी केली. मात्र इतके पैसे देण्यासाठी मी नकार दिला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या प्रदीप शर्मा यांनी यात मधस्थी केली. तेव्हा परमबीर सिंग म्हणाले की, प्रदीप शर्मा जे बोलतील ते फायनल करा. नाही तर या प्रकरणी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना त्रास होईल. ही घटना 2018 मध्ये जेव्हा मला खोट्या बेटिंग प्रकरणी अटके केली तेव्हाची आहे'', असे सोनू जलान म्हणाला. माझ्याकडं काही पुरावे असल्याचं सोनू जलान यांनी म्हटले आहे. 2019 पासून आम्ही डीजी, मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करत आलो आहे. जर एनआयएन् मला बोलावलं तर मी त्यांच्याकडे देखील जाईल आणि त्यांना देखील माहिती देईल, असे सोनू जलान म्हणाले.
सोनू जलान यांच्या वकील आभा सिंग या प्रकरणाबद्दल माहिती देताना.. हेही वाचा -परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, तीन प्रकरणांमध्ये एसीबीकडून गोपनीय चौकशी