मुंबई -मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिल्हार फाटा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला माकपाने पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून हे कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनास माकपाचा पाठिंबा
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला माकपाने पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून हे कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
कृषी कायद्यात बदल हवा
कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एकवटला आहे. सात दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या मनात या कायद्याविषयी काही शंका आहेत, त्यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. भाजपा सरकार जाहीरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असे सांगत आहेत. परंतू शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. हे शेतकरीविरोधी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केली आहे.