महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केईएम रुग्णालयात शनिवारपासून सिरम-ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीची चाचणी - नायर रुग्णालय कोरोना लस न्यूज अपडेट

सिरम-ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड या लसीच्या चाचणीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे दोन प्रकारचे आरोग्य विमा काढण्यात आले आहेत. त्यात १६० व्यक्तींचा १० कोटींचा समूह विमा आहे. तसेच, सहभागी व्यक्तींच्या औषधांच्या बिलांसाठी प्रत्येक व्यक्तीचा ३५ लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. केईएम रुग्णालयात ३५०पेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केली आहे. तर, नायर रुग्णालयात १०० व्यक्तींनी नोंदणी केली आहे.

केईएम रुग्णालय लेटेस्ट कोरोना न्यूज
केईएम रुग्णालय लेटेस्ट कोरोना न्यूज

By

Published : Sep 18, 2020, 12:32 PM IST

Updated : Sep 18, 2020, 2:00 PM IST

मुंबई - महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात सिरम-ऑक्सफर्डच्या (यूके) कोविशिल्ड लसीचा रुग्णांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास येत्या शनिवारपासून केला जाणार आहे. केईएम रुग्णालयातून याची सुरुवात होणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. याआधी ब्रिटनमध्ये या लसीचा प्रयोग करण्यात आलेल्या एका रुग्णाची प्रकृती खराब झाल्याने चाचणी थांबवली होती. मात्र, काही त्रुटी दूर केल्यानंतर याची पुन्हा चाचणी सुरू होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनावर लस शोधण्याचे काम सुरू असून त्याच्या रुग्णांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू आहे. याआधी सिरम-ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीचा ब्रिटनमध्ये प्रयोग करण्यात आलेल्या एका रुग्णाची प्रकृती खराब झाल्याने चाचणी थांबवली होती. मात्र, काही त्रुटी दूर झाल्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या मान्यतेनंतर मुंबईत या लसीची रुग्णांवर पुन्हा चाचणी केली जात आहे.

हेही वाचा -कॉर्पोरेट हब असलेले बीकेसी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, महिनाभरात ६० पॉझिटिव्ह

कोरोना लसीच्या चाचणीसंदर्भात आता सर्व पातळ्यांवर पूर्तता झाली असून केंद्राकडून चाचणी सुरू करण्याचे निर्देशही मिळाल्याने शनिवारपासून चाचणी सुरू होईल. कोरोनासाठीच्या कोविशिल्ड या लसीच्या चाचणीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे दोन प्रकारचे आरोग्य विमा काढण्यात आले आहेत. त्यात १६० व्यक्तींचा १० कोटींचा समूह विमा आहे. तसेच, सहभागी व्यक्तींच्या औषधांच्या बिलांसाठी प्रत्येक व्यक्तीचा ३५ लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. लसीच्या चाचणीदरम्यान या व्यक्तींवर काही दुष्परिणाम झाल्यास या विम्याचा लाभ मिळेल असे काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा -वरळीत नायट्रोजन गॅस टाकीचा स्फोट, महिला जखमी

केईएम रुग्णालयात ३५०पेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केली आहे. चाचणीच्या सुरुवातीच्या प्रक्रियेत या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. त्यानंतर चाचणीदरम्यान चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकाला तीन डोस देण्यात येतील, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. केईएम रुग्णालय प्रशासनाने या लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. या चाचण्या झाल्यानंतर रुग्णालयातील एथिक कमिटीची परवानगी घेऊन लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तर, आयसीएमआर लसीच्या चाचणीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या विम्याकरिता निवेदन दिले होते. नायर रुग्णालयातही लवकरच सर्व बाबींची पूर्तता करून लसीची चाचणी सुरू करण्यात येईल. आतापर्यंत या चाचणीसाठी १०० व्यक्तींनी नोंदणी केल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

Last Updated : Sep 18, 2020, 2:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details