नवी दिल्ली-राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाच्या ( NTAGI recommendation ) शिफारशीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व लाभार्थ्यांसाठी कोविड-19 लसीच्या दुसऱ्या आणि सावधगिरीच्या डोसमधील अंतर नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत कमी केले आहे. या नवीन लस प्रणालीसाठी, कोविन प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) स्थायी तांत्रिक उपसमितीच्या शिफारशीनुसार हा बदल करण्यात आला आहे. उपसमिती यामधील बदलावर विचार करत आहे. वैज्ञानिक पुरावे आणि जागतिक पद्धती हे लक्षात घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या शिफारशीला एनटीजीआयनेही मान्यता दिली असल्याचे भूषण यांनी सांगितले.
असा दिला जाणार डोस-केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, जागतिक पद्धत पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे की 18 ते 59 वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना खासगी कोविड लसीकरण केंद्रात सहा महिने किंवा दुसरा डोस 26 आठवडे पूर्ण झाल्यावर सावधगिरीचा डोस दिला जाईल. आरोग्य सचिव म्हणाले, 60 वर्षांवरील लाभार्थी आणि आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर असलेल्या कामगारांना, दुसरा डोस सहा महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर, सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर कोरोना लशीचा डोस मोफत दिला जाईल.
हर घर दस्तक दुसरी मोहीम राबवावी-याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याचा व्यापक प्रचार करावा, असेही ते म्हणाले. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना लिहिलेल्या या पत्रात ते म्हणाले, कोविड लसीकरण केंद्रे आणि घरांमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना सावधगिरीच्या डोसचा लाभ देण्यासाठी मी तुमच्या सहकार्याची आणि नेतृत्वाची अपेक्षा करतो. हर घर दस्तक दुसरी मोहीम राबवावी, असे त्यांनी आवाहन केले.