महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana Bail Petition Hearing : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी, घरच्या जेवणासाठीचा अर्जही फेटाळला

हनुमान चालीसा प्रकरणी ( Hanuman Chalisa Row ) कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याच्या ( Hearing On Rana Bail Petition ) जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र वेळेअभावी ही सुनावणी आज होऊ शकली नाही. न्यायालय या प्रकरणात शनिवारी सुनावणी ( Rana Bail Petition Hearing On Saturday ) घेणार आहे. राणा दाम्पत्यानी ( Rana Couple Application For Home Food ) घरचे जेवण मिळावे, यासाठी मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court ) अर्ज दाखल केला होता. या अर्जावरही आज सुनावणी झाली. यावेळी सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याचा अर्ज फेटाळला आहे.

Hanuman Chalisa Row
Hanuman Chalisa Row

By

Published : Apr 29, 2022, 12:13 PM IST

Updated : Apr 29, 2022, 7:31 PM IST

मुंबई -हनुमान चालीसा प्रकरणात( Hanuman Chalisa Row ) कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सत्र ( Hearing On Rana Bail Petition ) न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, वेळेअभावी ही सुनावणी आज होऊ शकली नाही. न्यायालय या प्रकरणात शनिवारी सुनावणी ( Rana Bail Petition Hearing On Saturday ) घेणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन मिळण्यात आणखी अडचण आली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यानी( Rana Couple Application For Home Food ) घरचे जेवण मिळावे, यासाठी मुंबई सत्र न्यायालयात( Mumbai Sessions Court ) अर्ज दाखल केला होता. या अर्जावरही आज सुनावणी झाली. यावेळी सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याचा अर्ज फेटाळला आहे. हनुमान चालीसा प्रकरणी आंदोलन केल्यामुळे अमरावतीच्याखासदार नवनीत राणाआणि आमदार रवी राणायांच्यावर खार पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक करुन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.

राणांच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांचा विरोध -खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज्य सरकार विरोधात राज्यात असंतोष निर्माण करत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करत सरकार बरखस्त करण्याची कट राणा दाम्पत्याने रचला होता, अशी माहिती आज जामीन अर्जावर उत्तर देताना मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळेच राणा दाम्पत्यांच्या विरोधात राज्यद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांकडून विरोध करण्यात आला असून आज सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर दिलेल्या उत्तरात गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई पोलिसांच्या अर्जात 'हे' आहेत मुद्दे -

  1. भारतात कायद्याने स्थापन केलेले सरकार पूर्णपणे अप्रामाणिक आणि अन्यायकारक आहे आणि ते रद्द करण्यासाठी हिंसाचाराने किंवा हिंसाचाराची धमकी देऊन पाऊल उचलले पाहिजे असे सुचवणारे भाषण कलम 124A च्या तरतुदींमध्ये येते.
  2. मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानी मातोश्री बंगल्यावर हनुमान चालीसा वाचण्याची योजना कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हा एक आव्हान निर्माण करण्याचा एक मोठा डाव होता. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असता अताचे सत्कार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यक्षम नाही असं सांगत राज्यपालांकडून सध्याचे सरकार बरखास्त करण्याची शिफारस केली जावी अशी योजना होती.
  3. सत्तेपासून वंचित राहिलेले विरोधी भाजप नेते सध्याच्या सरकारच्या प्रशासकीय धोरणांना कडाडून विरोध करत आहेत आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवरून शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आणि शिवसेनेचे राजकीय विरोधक धर्माच्या मुद्द्यावरून वादात आहेत.
  4. तपासात असे समोर आले आहे की आरोपी हे प्रबळ राजकीय विरोधक आहेत. त्यांनी तथ्ये विचारात घेऊन एक अतिशय प्रभावी योजना तयार केली आहे.
  5. कला नगर वांद्रे येथे असलेला मातोश्री बंगला हे शिवसेनेचे कट्टर अनुयायी एक पवित्र स्थान किंवा श्रद्धास्थान मानतात. मातोश्री आणि शिवसेनाप्रमुखांना कोणत्याही प्रकारचे आव्हान शिवसैनिकांना कदापि सहन होत नाही आणि मातोश्री किंवा शिवसेनेच्या शिवसेना कार्यालयाला आव्हान दिल्यास ते प्राणाची आहुती देण्यास तयार आहेत. त्यामुळे असे आव्हान दिल्याने शांतता भंग होईल आणि कायदा व सुव्यवस्था व सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल हे आरोपीस माहीत होते.
  6. सध्याचे सरकार हिंदू धर्माचे समर्थन करत नाही आणि मुख्यमंत्री हिंदूंच्या विरोधात आहेत असा आभास निर्माण करण्यात आला. सामान्य जनतेच्या मनात द्वेष किंवा तिरस्कार निर्माण होईल किंवा महाराष्ट्र सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न. त्याच पद्धतीने शिवसैनिकांना शिवसेनेविरुद्धच्या कोणत्याही कारवाईला विरोध करण्यास प्रवृत्त करत येईल पण त्याच बरोबर धर्माच्या मुद्द्यावरून दुजाभाव आणि शत्रुत्वाच्या भावना वाढवण्यासाठी नागरिकांमध्ये असंतोष किंवा असंतोष निर्माण होईल. सध्याच्या राजवटीत हिंदूंना त्यांचा धर्म मोकळेपणाने आचरणात आणणे अवघड झाले आहे आणि त्यामुळे मुस्लीम धर्माविरुद्ध पर्यायाने द्वेषाची भावना वाढेल आणि त्यामुळे विविध वर्गातील नागरिकांमधील तेढ वाढून धर्माच्या मुद्द्यावरून समाजात फूट पडेल, असे मुद्दे मुंबई पोलिसांच्या अर्जात म्हटले आहे.

घरचे जेवण देण्याची मागणी फेटाळली -नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि रवी राणा यांनी घरचे अन्न मिळावे ( Navneet Rana application for home food ) यासाठी मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court ) अर्ज केला होता. आज सत्र न्यायालयाने यासंदर्भात सुनावणी घेत राणा दाम्पत्याच्या ( Rana Couple applied for home food ) अर्ज फेटाळला आहे.

संजय राऊतांचा आरोप -युसूफ लकडावाला याला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. तो अटकेत असताना त्याच्या अकाउंटमधून ज्या ज्या लोकांना पैसे गेले अथवा ज्यांनी ज्यांनी त्याच्याशी आर्थिक व्यवहार केले, त्या सर्वांची चौकशी झाली. मग या राणा दाम्पत्यालाच का सुट दिली? युसूफच्या अवैध कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणाच्या खात्यात आहे. मग ED ने ही सूट का दिली? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

वाद कसा सुरू झाला? - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे काढण्यात यावे, अन्यथा 3 मे पासून मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) सुरू करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राजकारण करायचे असल्याची टीका राजकीय नेत्यांनी सुरू केली. संजय राऊत, शरद पवार यांनीही याप्रकरणी राज ठाकरेंच्या या भूमीकेवर जहरी टीका केली. महाविकास आघाडी, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी 16 एप्रिलला या वादात उडी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) करावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी राणांच्या घरी हनुमान चालीसा पठण केले. यावर राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता, त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला.

Last Updated : Apr 29, 2022, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details