मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांना फरार घोषित करण्यासंदर्भातला निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचं की नाही, यावर सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. मुंबई गुन्हे शाखेतर्फे(Mumbai Crime Branch) सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. तर, सिंग सध्या गायब असून न्यायालयातही ते हजर राहत नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्स देखील बजावण्यात आला होता. मात्र, काहीही प्रत्युत्तर न आल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.
- न्यायालयाने निर्णय ठेवला राखून -