मुंबई - अंधेरी पूर्व येथील निधन झालेले आमदार रमेश लटके ( MLA Ramesh Latke ) यांच्या पत्नी ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून ( Uddhav Thackeray group ) उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेकडून मंजूर केला जात नव्हता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवावे असे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. यावर मुंबईच्या माजी महापौर शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar ) यांनी एक ट्विट केले आहे. त्यात "अखेर विजय, सत्यमेव जयते" असे लिहीत कोर्टाच्या निर्णयाचे केले स्वागत केले आहे.
सत्यमेव जयते म्हणत किशोरी पेडणेकरांचे ट्विट
शिवसेनेचे नेते अरविंद म्हणाले जनतेच्या न्यायालयातील लढाई आम्हीच जिंकणार - तर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी सत्यमेव जयते, कोर्टातील लढाई जिंकली, आता जनतेच्या न्यायालयातील लढाई पण आम्हीं जिंकून दाखवणारच असे ट्विट केले आहे.
राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत मंजूर करा -ऋजुता लटके यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. लटके यांचा राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत मंजूर करावा असे न्यायालयाने पालिकेला निर्देश दिले. आज कोर्टात या प्रकरणी जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. ऋतुजा लटके यांच्या याविरोधात गंभीर तक्रारी आल्या आहेत. म्हणून अद्याप राजीनामा मंजूर केलेला नाही असे पालिकेने आज कोर्टात सांगितले. मात्र कोर्टाने लटके यांची बाजू ग्राह्य मानली.
काय झाला युक्तीवाद - ऋतुजा लटके यांच्या याविरोधात गंभीर तक्रारी आल्या आहेत. म्हणून अद्याप राजीनामा मंजूर केलेला नाही असे पालिकेने आज कोर्टात सांगितले. या भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत असेही पालिकेच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले. ऑक्टोबर महिन्यात दाखल तक्रार प्रलंबित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अंधेरीच्या एका व्यक्तीची तक्रार असल्याची माहितीही देण्यात आली. त्यावर ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणूक लढू न देण्यासाठी म्हणून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा त्यांनी आरोप केला.
राजीनामा पालिकेने अजून मंजूर केलेला नाही -दुसरीकडे ऋजुता लटके यांचा राजीनामा पालिकेने अजून मंजूर केलेला नाही. राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे म्हणणे आणि प्रशासनाकडे असलेली माहिती यांची पडताळणी केली जाते. एक महिना कालावधीत याबाबत चौकशी केल्यानंतर राजीनाम्याबाबत प्रशासन निर्णय घेते. त्यांचे अधिकृत राजीनामा पत्र 3 ऑक्टोबरला मिळाले आहे. त्यात दाखल एका तक्रारीची पडताळणी अद्याप बाकी आहे. बीएमसीचे वकील अनिल साखरे यांनी ही माहिती कोर्टाला दिली. ऋतुजा लटके यांनी राजीनामा पाठवला असला तरी त्यांनी काहीही संवाद प्रशासनाशी केला नाही. 3 ऑक्टोबरला राजीनामा दिला. त्यानंतर 12 ऑक्टोबरला ऋतुजा यांच्या विरोधात एक व्यक्तीने तक्रार केली आहे असे साखरे म्हणाले.