मुंबई - भारतात कालच्या तूलनेत आज पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढले ( Increase in the number of corona virus patients ) आहेत. काल संपूर्ण दिवसात कोरोनाचे 20,551 नवीन रूग्ण आढळले ( Corona patient ). गुरूवारी हीच आकडेवारी 19,893 एवढी होती. तर सकारात्मकबाब म्हणजे 21,595 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत ( Corona patient discharges ) . त्यामुळे देशभरात 1,35,364 सक्रिय रुग्ण आहेत. तर पोझिटीव्हीटी रेट हा 5.14% इतका झाला आहे.
दिल्लीत कोरोना वायरसची स्थिती -दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाची 2,202 नवीन प्रकरणे आढळून आली. यात दरम्यान काल कोरोनाच्या 4 रूग्णांचा मृत्यू झाला. सुदैवाने 1,660 रूग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत सकारात्मकता दर 11.84 टक्के इतका आहे. तर 6,175 सक्रिय रूग्ण सध्या दिल्लीत आहे. गुरूवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीमध्ये 2 हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली होती. पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक हजार 437 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.