मुंबई -आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Corona Cases) व्हायरसची लागण झालेल्या 12,751 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच सक्रिय रुग्णांच्या (Active Cases) संख्येत घट झाली असून ही संख्या 1,31,807 वर पोहोचली आहे. काल देशात 16167 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 तासांतच बाधितांचा आकडा वाढून 12 हजारांवर पोहोचला आहे. तसेच, कोरोनाचा सकारात्मकता दर 3.50% इतका आहे.
मुंबईत ४०७ नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू -मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. त्यात वाढ होऊन बुधवार पासून रोज ४०० च्या वर रुग्णांची नोंद होत आहे. आज सोमवारी ४०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २६० बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
४०७ नवे रुग्ण - मुंबईत गेल्या २४ तासात ६,२)७२९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४०७ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. १६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख २७ हजार ९५४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ५ हजार ३१७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २,९७७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २००१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३५ टक्के इतका आहे.