महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाची धास्ती : राज्यातील शाळा-महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हे आदेश जारी केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालयात आणि त्यासोबतच आयटीआय आदी सर्व शैक्षणिक संस्था या 31 मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात, असे आदेशात म्हटले आहे.

कोरोनाची धास्ती
कोरोनाची धास्ती

By

Published : Mar 14, 2020, 6:24 PM IST

Updated : Mar 14, 2020, 9:41 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या होणाऱ्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केले आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोना संक्रमित 26 जण रुग्ण सापडले आहेत. दहावी-बारावी आणि विद्यापीठांच्या परीक्षा मात्र सुरू ठेवाव्यात आणि त्यासाठी खबरदारी घ्यावी, असेही आदेश विभागाने राज्यातील शिक्षण विभागासोबत संबंधित विभागाला दिले आहेत.

राज्यातील शाळा-महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश

सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालयात आणि त्यासोबतच आयटीआय आदी सर्व शैक्षणिक संस्था या 31 मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात असे आदेशात म्हटले आहे. राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सोबतच विविध महाविद्यालयांच्या ही परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात यावेत, असाही निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार या परीक्षा घेतल्या जाव्यात असे या आदेशात म्हटले आहे. मात्र या परीक्षा घेताना एखादा आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी आवश्यक ती दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचनाही संबंधित संस्था प्रमुखांना देण्यात याव्यात असे स्पष्ट म्हटले आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणच्या जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आहे. मात्र, यादरम्यान दहावीची परीक्षा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या तरतुदीनुसार निघाली अधिसूचना..

आरोग्य विभागाने हे आदेश कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ याचा आधार घेतला आहे. त्या कायद्यानुसार खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

दरम्यान, चीनमधील कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले आहे.

Last Updated : Mar 14, 2020, 9:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details