मुंबई -राज्यात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. फेब्रुवारीनंतर राज्यात दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांवर गेली होती. सध्या ही सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांच्या खाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात कमी होत असताना सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात आहेत. तर सर्वात कमी सक्रिय रुग्ण नंदुरबार व गडचिरोली येथे आहेत.
६३ लाख २१ हजार ६८ रुग्णांची नोंद
राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या ६३ लाख २१ हजार ६८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६१ लाख १० हजार १२४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के इतके आहे. १ लाख ३३ हजार २१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युदर २.११ टक्के आहे. राज्यात सध्या ७४ हजार ३१८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात ३ ऑगस्ट रोजी ७४ हजार ३१८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात १५ हजार ५५२, सांगलीत ७ हजार ३०१, सातारा येथे ६ हजार ८४८, अहमदनगर येथे ६ हजार ५७०, ठाणे येथे ५ हजार ९८२, कोहापूर येथे ५ हजर ४०४, मुंबईत ४ हजार ९९६, सोलापूर येथे ४ हजार ७७६ रुग्ण आहेत.