मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. सोमवारी 2 हजार 026, मंगळवारी 2 हजार 401, बुधवारी 2 हजार 876 तर गुरुवारी 2 हजार 681 तर आज शुक्रवारी 8 ऑक्टोबरला 2 हजार 620 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 59 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 2 हजार 943 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
33,011 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 2620 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 73 हजार 92 वर पोहचला आहे. तर आज 59 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 470 वर पोहचला आहे. आज 2 हजार 943 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 97 हजार 18 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 99 लाख 14 हजार 679 नमुन्यांपैकी 65 लाख 73 हजार 92 नमुने म्हणजेच 11 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 972 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 33 हजार 011 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.