मुंबई - कोरोना व्हायरसचा वाढत्या संक्रमानामुळे मुंबई शहरवासियांची चिंता वाढली आहे. त्यातच या व्हायरसच्या कचाट्यात मुंबई पोलीस खात्यातील काही कर्मचारी सुद्धा आले आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे मुंबई पोलीस खात्यातील एका उपायुक्तांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या अधिकाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरिही कर्मचाऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण... - मुंबई कोरोना न्युज
कोरोना व्हायरसचा वाढत्या संक्रमानामुळे मुंबई शहरवासियांची चिंता वाढली आहे. त्यातच या व्हायरसच्या कचाट्यात मुंबई पोलीस खात्यातील काही कर्मचारी सुद्धा आले आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा...... आता आग नाही लावली म्हणजे झालं, दिवे लावण्याच्या कल्पनेवरुन मोदींवर सोशल मीडियावर टीका
मुंबई पोलीस खात्यातील एका पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे एका खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेले त्याचे सहकारी व कार्यालयातील कर्मचार्यांना सुद्धा क्वारंनटाईन करण्यात आले. दरम्यान खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.