मुंबई :महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गला आळा बसवण्यासाठी एक-दोन दिवसांत कठोर निर्बंधाची घोषणा होऊ शकते. असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पुन्हा राज्यात 15 तारखेपासून लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत मुंबईतील परप्रांतीय घरी जाण्यासाठी लोकमान्य टिळक स्थानकात रविवारी रात्री उशिरापर्यंत थांबल्याचे चित्र होते.
आज सकाळपासून पुन्हा लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठया प्रमाणात परप्रांतीय थांबल्याचे चित्र बघायला मिळाले. गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन लागला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. म्हणून आम्हाला आमच्या गावी जाऊद्या, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. हातामध्ये आणि पाठीवर मोठ-मोठ्या बॅगा घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली. यूपी, बिहार, राजस्थानला जाणारे अनेक प्रवासी या ठिकाणी होते.