महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात 18 हजार 166 कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण - state Corona preventive vaccination

राज्यात आज 267 केंद्रांवर 18 हजार 166 (68 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.

Corona preventive vaccination
Corona preventive vaccination

By

Published : Jan 20, 2021, 10:08 PM IST

मुंबई - राज्यात आज 267 केंद्रांवर 18 हजार 166 (68 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार आणि आज बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण 51 हजार 660 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी -

अकोला (224, 75 टक्के), अमरावती (558, 112 टक्के), बुलढाणा (458, 76 टक्के), वाशीम (221, 74 टक्के), यवतमाळ (363, 73 टक्के), औरंगाबाद (310, 31 टक्के), हिंगोली (214, 107 टक्के), जालना (279, 70 टक्के), परभणी (284, 71 टक्के), कोल्हापूर (778, 71 टक्के), रत्नागिरी (290, 58 टक्के), सांगली (435, 48 टक्के), सिंधुदूर्ग (179, 60 टक्के), बीड (358, 72 टक्के), लातूर (473, 79 टक्के), नांदेड (323, 65 टक्के), उस्मानाबाद (240, 80 टक्के), मुंबई (666, 61 टक्के), मुंबई उपनगर (1062, 82 टक्के), भंडारा (241, 80 टक्के), चंद्रपूर (432, 72 टक्के), गडचिरोली (185, 46 टक्के), गोंदिया (223, 74 टक्के), नागपूर (921, 77 टक्के), वर्धा (543, 91 टक्के), अहमदनगर (683, 57 टक्के), धुळे (366, 92 टक्के), जळगाव (523, 75 टक्के), नंदुरबार (313, 78 टक्के), नाशिक (932, 72 टक्के), पुणे (1109, 38 टक्के), सातारा (840, 76 टक्के), सोलापूर (869, 79 टक्के), पालघर (558, 90 टक्के), ठाणे (1774, 77 टक्के), रायगड (139, 35 टक्के).

ABOUT THE AUTHOR

...view details