मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. राज्यात प्रतिदिन तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज शुक्रवारी ३ सप्टेंबर रोजी ४,३१३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात ५५ मृत्यूची नोंद झाली होती आज त्यात वाढ होऊन ९२ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातून आज ४,३६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ५०,४६६ सक्रिय रुग्ण -
राज्यात ४,३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८६,३४५ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४३१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७,६४३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४४ लाख ८७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७७ हजार ९८७ (११.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार ०९८ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५०,४६६ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार -
गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.