मुंबई - राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ होताना दिसत ( Covid Outbreak In Maharashtra ) आहे. आज दिवसभरात 36 हजार 365 बाधितांची नोंद ( 36000 New Covid Cases In Maharashtra ) झाली. त्यापैकी मुंबईत सुमारे 20 हजार रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी झाला आहे. आज एकूण 13 रुग्ण दगावले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे 79 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचे आठ हजार 907 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
दहा हजाराच्या झाली वाढ
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. मागील आठ दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यभरात सापडत ( Maharashtra Corona Update ) आहेत. गेल्या दोन दिवसांत भरमसाठ रुग्णवाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी 26 हजार बाधितांची नोंद झाली होती. आज तब्बल 10 हजार रुग्णांची यात भर पडली आहे. त्यामुळे आजची रुग्णसंख्या 36 हजार 365 वर पोहचली आहे. त्यापैकी केवळ मुंबईत 20 हजार 181 रुग्णांची नोंद आहे. राज्यात यामुळे 67 लाख 93 हजार 297 झाली आहे. दिवसभरात 8 हजार 907 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 33 हजार 154 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 96.17 टक्के इतका आहे. दिवसभरात 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.8 टक्के इतका ( Covid Death Rate Maharashtra ) आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 99 लाख 47 हजार 436 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.71 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1368 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 1 लाख 14 हजार 847 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे आतापर्यंत 75 रुग्ण
राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि एनसीसीएस केलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनच्या 79 नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी सर्वाधिक 57 रुग्ण मुंबईतील आहेत. ठाणे मनपा 7, नागपूर 6, पुणे मनपा 5, पुणे ग्रामीण 3, पिंपरी चिंचवड 1 येथील आहेत. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 876 झाली आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे ( Omicron In Maharashtra ) आहे.
ओमायक्रॉनचे 381 रुग्ण घरी परतले