महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मानखुर्द बाल सुधारगृहात कोरोनाचा शिरकाव; किरीट सोमैया यांची मानव आयोगात याचिका - भाजपा नेते किरीट सोमैया

वसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील २९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या शेल्टर होममधील ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे या केंद्रातील सर्वांची चाचणी व्हावी व सरकार यासाठी काय करत आहे यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मानव आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.

kirit somaiya speaks
मानखुर्द बाल सुधारगृहात कोरोनाचा शिरकाव; किरीट सोमैया यांची मानव आयोगात याचिका

By

Published : Jul 28, 2020, 6:00 PM IST

मुंबई - दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील २९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या शेल्टर होममधील ६० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे या केंद्रात असणाऱ्या सर्वांची चाचणी व्हावी व सरकार यासाठी काय करत आहे यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मानव आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.

मानखुर्द बाल सुधारगृहात कोरोनाचा शिरकाव; किरीट सोमैया यांची मानव आयोगात याचिका
मानखुर्द बालसुधारगृह परिसरात गतीमंद व्यक्तींसाठीही शेल्टर होम आहे. त्यात लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध गतीमंद व्यक्तींनाही ठेवण्यात येते. या सुधारगृहात सध्या 268 व्यक्ती आहेत . त्यातील काहींना लक्षणं आढळल्याने 60 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील 29 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे सर्वांची चाचणी करायला हवी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच याठिकाणी कोरोना प्रसार कसा झाला याचा शोध घेतला पाहिजे व या ठिकाणी पुढे उपाययोजना काय याबाबत भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मानव आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. समाज कल्याण आणि पालिका आयुक्त यामध्ये प्रतिवादी म्हणून असणार आहेत, अशी माहिती सोमैया यांनी दिली.
बालसुधारगृहातील सर्वांची चाचणी व्हावी, तसेच सरकार यासाठी काय करत आहे, यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मानव आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
बालसुधार गृहात बहुतांश व्यक्तींना कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. पण काही व्यक्तींना मधुमेह, रक्तदाबासारखे आजार आहेत. त्यामुळे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून सध्या वैद्यकीय सल्ला घेण्यात येत आहे. तसेच कोरानासह इतर आजार असलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाली सुरू आहेत . या सर्वांना नेमका कोणामुळे कोरोना झाला, हे स्पष्ट झाले नसले, तरी या शेल्टर होममध्ये काम करणारे कर्मचारी व मानखुर्द बालसुधारगृहातील कर्मचारी एकाच कर्मचारी वसाहतीत राहतात. मानखुर्दच्या बालगृहामध्ये रक्षक पदावर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्याचा नुकताच काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच त्यावेळी दोन कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढे योग्य काळजी घेण्यासाठी आणि केंद्रातील सुरक्षेसाठी सोमैया यांनी मानव आयोगाकडे तक्रार करत याचिका दाखल केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details