महाराष्ट्र

maharashtra

चिंताजनक.. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली, रुग्णसंख्या ३०० च्या घरात

By

Published : Dec 18, 2021, 8:14 PM IST

मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार आटोक्यात असला तरी गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णसंख्या (Corona cases in mumbai) वाढू लागली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही समोर येत आहेत. यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

corona cases in mumbai
corona cases in mumbai

मुंबई -मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार आटोक्यात असला तरी गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरोनाचे रुग्ण (Corona cases in mumbai )वाढत असताना ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही समोर येत आहेत. यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आणि आरोग्य विभाग अलर्ट झाला असून रुग्णसंख्या वाढू नये यासाठी कामाला लागला आहे.

रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या पावणे दोन वर्षात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबईत पहिली लाट गेल्या वर्षी मार्च महिन्यात तर दुसरी लाट यावर्षी फेब्रुवारीनंतर आली. दुसऱ्या लाटे दरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला ११ हजार रुग्ण आढळून आले आहेत. मात्र जूननंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. १ डिसेंबरला सर्वात कमी म्हणजे १०८ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या २०० च्या वर गेली आहे. १५ डिसेंबरला २३८, १६ डिसेंबरला २७९, १७ डिसेंबर २९५ रुग्ण आढळून आले आहेत.

7 लाख 66 हजार नागरिकांना कोरोना -

शहरात आतापर्यंत एकूण 7 लाख 66 हजार 508 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 45 हजार 628 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1,940 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2,468 दिवस इतका आहे. मुंबईमधील 19 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर (Corona Growth Rate in Mumbai ) 0.03 टक्के इतका आहे.

'या' दिवशी रुग्णसंख्या 200 च्या वर -


मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला पुन्हा वाढ होऊन 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबर 295 रुग्ण आढळून आले आहेत.

तीन वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद होत होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यू संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

पालिका अलर्टवर -


मुंबईमध्ये ख्रिसमस आणि ३१ जानेवारी हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यासाठी परदेशातून आणि देशभरातून लोक मुंबईत येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊन रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. त्यासाठी पालिकेने रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील १५ हजार बेड्स सज्ज ठेवले आहेत. सध्या सुरू असलेली व नव्याने सुरु केली जाणारी कोविड सेंटर यामधून आणखी १५ हजार बेड्स उपलबध करून दिले जाणार आहेत. यामुळे ३० हजार बेड्स उपलब्ध होणार आहेत. विभागवार कोविड सेंटर सुरु केली जातील त्याद्वारे सुमारे ७० हजार बेड्स उपलब्ध होतील. लागणारी औषधे आणि ऑक्सिजनचा साठा असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करता यावेत म्हणून चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचे काकाणी यांनी संगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details