मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस तीन हजारावर त्यानंतर सलग तीन दिवस पाच हजारावर रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन सलग दुसऱ्या दिवशी 6 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. आज 6,923 नवे रुग्ण एकाच दिवशी आढळून आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक रुग्णांची नोंद -
मुंबईत 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात वाढ होऊन 6923 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 98 हजार 674 वर पोहचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 649 वर पोहचला आहे. 3380 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 40 हजार 935 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 45 हजार 140 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 58 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 57 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 569 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 39 लाख 83 हजार 380 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -