मुंबई - जगभरातील शंभरपेक्षा अधिक देशांत गेल्या 2 महिन्यापासून कोरोना विषाणूने हजारो लोकांना विळखा घातला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर एका कवी मनाच्या डॉक्टरने कोरोना विषाणूवर कवितेतून जनजागृती केली आहे. रजनीकांत मिश्रा असे या डॉक्टरांचे नाव आहे.
कोरोना विषाणूचा वेगाने फैलाव होत असल्याने सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. सरकार आणि सामाजिक संस्था यावर जनजागृती करत आहेत. नुकतेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही कोरोनाची नागरिकांनी मनात कसलीही भीती न बाळगता तोंड द्यावे आणि कोरोनाला पळवून लावू, असे कवितेतून सादर केले होते. अशाच प्रकारे, मुंबईतील एका डॉक्टरांनीही आपल्या कवितेच्या माध्यमातून जनजागृतीला सुरुवात केली आहे. डॉक्टर आणि कवी रजनीकांत मिश्रा यांनी कोरोना विषाणूला न घाबरता कशा प्रकारे त्याचा सामना करायचा हे आपल्या कवितेतून मांडले आहे. त्यांच्याशी बातचीत घेतली आहे, आमचे प्रतिनिधी अनुभव भागवत यांनी.