मुंबई :मुंबईतील गुजराती बांधवांकडून तसेच अन्य तरुण तरुणांकडून नवरात्र उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात दांडिया खेळामध्ये भाग घेतला (Mumbai Navratri Festival) जातो. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मोठ्या कंपन्यांकडून दांडिया रासचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. मोठ्या सुप्रसिद्ध नामांकित गायकांकडून या खेळांना उपस्थिती दर्शवण्यात येत असल्याने तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात दांडीयांना हजेरी लावतात.
मुंबईतील काही मैदानांवर फाल्गुनी पाठक यांच्यासारख्या गायकांनी आयोजित केलेल्या दांडियासाठी आतापासूनच मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू आहे. त्याचसोबत दांडियामध्ये सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींकडून दांडियासाठीच्या विशेष कपड्यांची तयारीही सुरू करण्यात आली (Consumer preference for handcraft dresses) आहे.
कलाकुसर असलेल्या कपड्यांना मागणी -दांडियासाठी सर्वसाधारणपणे पुरुष कुर्ता-पायजमा आणि स्त्रिया चोली- घागरा, असा पोशाख परिधान (handcraft dresses for Navratri Dandiya) करतात. या पोशाखावर जास्तीत जास्त आकर्षक कलाकुसर एम्ब्रोईडरी आणि रंगीबेरंगी काचा असतील, तर त्याला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याची माहिती गरबा पोशाख विक्रेते रमेश यांनी दिली. मोठा घेर असलेले घागरा त्यावर केलेली कलाकुसर, ही अत्यंत आकर्षक आणि देखणी दिसते. पुरुषांच्या पायजमा धोती पायजमा आणि कुर्ता यावरही सुंदर कलाकुसर करण्यात आलेली आहे. त्याशिवाय कलाकुसर केलेले जाकीटही मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचे रमेश यांनी (handcraft dresses for Navratri) सांगितले.
ग्राहकांकडून भाड्याने आणि विकत बुकिंग सुरू -दांडिया उत्सवासाठी ग्राहकांकडून विकत आणि भाड्याने पोशाखाची मागणी केली जाते. या पोशाखांची किंमत सोळाशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे. ज्या प्रमाणात पोशाखावर कलाकुसर केलेली असेल त्या प्रमाणात त्याची किंमत ठरते. तर भाड्याने ग्राहकांना पोशाख हवा असेल, तर तो साडेतीनशे ते पाचशे रुपये प्रती दिवस असा भाड्याने दिला जातो. दांडिया खेळणाऱ्या ग्राहकांना यासाठी मुंबईतील लालबागच्या मार्केटमध्ये पोशाखासाठी बुकिंग करावे लागणार (Navratri Dandiya )आहे.