महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 11, 2022, 9:55 PM IST

ETV Bharat / city

महिलेला सतत टोमणे मारणे, अपमान करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे असे नाही; सत्र न्यायालयाचे निरीक्षण

पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणात पती आणि सासुवर 2015 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर न्यायालयाने निकाल देत आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की नियमित टोमणे मारणे किंवा अपमानास्पद शब्दाने बोलणे हे आत्महत्या साठी प्रवृत्त करण्यासाठी कारण असू शकत नाही असे निरीक्षण नोंदवत पती आणि सासूची नुकतीच निर्दोष सुटका केली आहे.

सत्र न्यायालय
सत्र न्यायालय

मुंबई -न्यायालयाने असे म्हटले आहे, की मुंबईमध्ये समाजाच्या खालच्या स्तरातील स्त्रीच्या दैनंदिन जीवनात नेहमीच टोमणे मारणे, अपमान करणे हे घडत आहे. परंतु, हे आत्महत्येस प्रवृत्त करणे असे होत नाही असे निरीक्षण नोंदवत आरोपी पती आणि सासूला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

निर्दोष मुक्तता - प्रशांत शेलार आणि आई वनिता शेलार यांच्यावर प्रशांतची पत्नी प्रियांकाच्या आत्महत्येचा आरोप प्रियंकाच्या आई-वडिलांनी केला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन्हीही आरोपी जामिनावर सोडण्यात आले होते. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने 7 वर्षानंतर निकाल देत दोन्हीही आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.पी मेहता यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

अपमानास्पद वागणूक - 16 जानेवारी 2015 रोजी प्रियंकाने आत्महत्या करून तिचा प्रियकर प्रशांतसोबत लग्न केल्यानंतर एका महिन्यातच मृत्यू झाला. प्रियंकाच्या आई-वडिलांनी तिचा शेलार कुटुंबीयांकडून खेड तसेच तिला अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचे प्रियंकाने आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला होता.

आरोग्याला कधी धोका निर्माण - न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे, की या प्रकरणाची वस्तुस्थितीला मानसिक क्रूरता कारणीभूत आहे असे म्हणता येणार नाही. कारण ही एक नैसर्गिक घटना आहे. दोन्ही पक्ष ज्या कुटुंबाशी संबंधित आहेत त्या कुटुंबाच्या या स्थितीत सामान्यत तेच पाहिले जाऊ शकते. न्यायाधीश पुढे म्हणाले. प्रियांकाला प्रशांतने फोनवर इतरांशी बोलण्याची परवानगी दिली नाही म्हणून या परिस्थिचा मानसिक छळ होत असल्याचा अंदाज लावता येणार नाही. प्रशांतने तिच्या जीवनाला किंवा आरोग्याला कधी धोका निर्माण केला असे कुठलेही पुरावे तपासात पोलिसांकडून आढळून आले नाहीत.

घर काम करण्याच काम करत होती - फिर्यादीनुसार 9 डिसेंबर 2014 रोजी लग्न होण्यापूर्वी प्रशांत आणि प्रियंका चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. प्रियांकाच्या आईने दावा केला की लग्नानंतर प्रियांकाने तिच्याकडे छळाची तक्रार केली. प्रियंकाच्या आईने आरोप केला होता की प्रियंकाची सासू वनिता शेलार तिला तिच्या काळ्या रंगावरून टोमणे मारायची सकाळी लवकर उठायला लावायची आणि नीट झोपू देत नव्हती. प्रशांत हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. प्रियांकाने केलेल्या आत्महत्येच्या दिवशी ती कामावर गेली असता प्रशांतने तिला फोन करून घरी न परतण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रियंका ज्या ठिकाणी घर काम करण्याच काम करत होती त्याच ठिकाणी प्रियंकाने आत्महत्या केली होती.

प्रियांकाला आत्महत्या करायला भाग पाडले - फिर्यादीच्या साक्षीदारांनी त्यांच्या पुराव्यांमध्‍ये आरोप केलेल्‍या त्‍यांच्‍या कृत्‍याने प्रियांकाला आत्महत्या करायला भाग पाडले असल्‍याचे कुठेही दिसत नाही. फिर्यादी साक्षीदारांनी त्यांच्या पुराव्यामध्ये जे काही सांगितले आहे ते सहसा प्रियांका ज्या समाजाची होती त्या समाजातील खालच्या स्तरातील महिलांच्या दैनंदिन जीवनात घडते न्यायालयाने तिचा पती आणि सासू यांना दोषमुक्त करताना निरीक्षण केले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details