मुंबई -राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वतंत्रपणे लढवल्या जाव्यात असा सूर मुंबई काँग्रेसमधून उमठत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढवणार?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील काँग्रेस कार्यालयामध्ये 51 कुपोषित बालकांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळेस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा कल हा स्वतंत्र निवडणुका लढवण्याकडे असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव हा मुंबई काँग्रेसकडून देण्यात आलेला असून, हा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर चर्चेला घेऊन आपण त्यावर निर्णय घेऊ, असं महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी म्हटले आहे.