मुंबई :अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri Assembly by election) मतदारसंघाच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजप - शिंदे गटाचे मुरजी पटेल यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. लटकेंकडे सहानुभूती लाट असली, तरी पटेल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. हा मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या पोटनिवडणुकीत येथे कॉंग्रेसची मते निर्णायक ठरणार Congress votes in Andheri Assembly by election आहेत.
प्रचाराचा धुरळा उडाला -अंधेरीच्या पोट निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आज उडाला आहे. शिवसेनेकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत नामांकन अर्ज भरले. या मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार मतदार आहेत. मतदारसंघात शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्ट्यांमध्ये ही लोकसंख्या विभागलेली आहे. मराठी भाषिकांसह पारशी, पंजाबी, उत्तर भारतीय, बिहारी अशा प्रकारे हिंदु मतदार संघ आणि मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी असा बहुभाषिक मतदार वर्ग येतो. या विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे नऊ प्रभाग येतात. मुरजी पटेल व त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक होते.
सहा महिन्यांत गेले नगरसेवक पद : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद अवघ्या सहा महिन्यांत रद्द झाले. त्यामुळे एका जागी शिवसेनेचे संदीप नाईक, तर दुसऱ्या जागी काँग्रेसचे नितीन सलाग्रे निवडून आले होते. तसेच शिवसेनेचे संदीप नाईक, प्रमोद सावंत व सदा परब असे तीन माजी नगरसेवकांचा जनसंपर्क दांडगा आहे. तर काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा राय यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जगदीश कुट्टी, विन्नी डिसोझा हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेचे पारडे येथे जड मानले जात असले, तरी भाजपचे सुनील यादव आणि अभिजीत सामंत यांचे प्रभागही या मतदारसंघात येतात. त्यामुळे काटेरी टक्कर पोट निवडणुकीत पहायला मिळणार (Congress votes in election) आहे.
कॉंग्रेसची मते निर्णायक ठरणार -सन 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे रमेश लटके यांना निवडून दिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तर शिवसेनेकडून रमेश लटके आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक जगदीश अमीन कुट्टी हे उभे होते. या तीन उमेदवारांमध्ये ही प्रमुख लढत झाली होती. त्यावेळी रमेश लटके यांना ६२ हजारांहून अधिक मते मिळाली होती, तर त्या खालोखाल मुरजी पटेल यांनी ४५ हजार मते आणि कुट्टी यांना २७ हजार मते मिळाली होती.
२०१९च्या निवडणुकीतील स्थिती : लटकेंच्या निधनानंतर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा मुरजी पटेल नशीब आजमावत आहेत. सेनेच्या ऋतुजा लटके त्यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. लटकेंना मानणारा वर्ग, पारंपारिक मते, सेनेची, सोबत कॉंग्रेसती मते आणि सहानुभूती असेल, अशी शक्यता आहे. परंतु, मुरजी पटेल हे काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. २०१६ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आजही ते काँग्रेसच्या मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी बनली असली तरी येथील कॉंग्रेसची मते निर्णायक ठरणार (Congress votes decisive) आहेत.२०१९च्या विधानसभा निवडणुकीतील मते-रमेश लटके (शिवसेना)- ६२,७७३, मुरजी पटेल (अपक्ष)- ४५,८०८, जगदीश कुट्टी (कॉंग्रेस)- २७,९५१,एकूण मतदान- १,४७,११७ (votes in Andheri Assembly by election).