महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Andheri East assembly constituency : अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा ; मुस्लिमासह बहुजनांची मते मिळणार का ? - पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा

महाराष्ट्रात काँग्रेसने मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri East assembly constituency) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला (Congress Support Uddhav Thackeray) आहे. या जागेवर ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे.

Uddhav Thackeray and Nana Patole
उद्धव ठाकरे व नाना पटोले

By

Published : Oct 7, 2022, 9:36 AM IST

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसने मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri East assembly constituency) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला (Congress Support Uddhav Thackeray) आहे. या जागेवर ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने रिंगणात उतरलेल्या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी रुतुजा लटके यांना आपला पक्ष पाठिंबा देईल, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी सांगितले.



सर्व शक्ती पणाला लावणार -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उमेदवार लटके यांच्या पत्नी रुतुजा लटके यांना पाठिंबा दिला जाईल. काँग्रेसचे अध्यक्ष पटोले म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून ‘जातीयवादी’ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची (एमव्हीए) स्थापना केली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, तर भाजपविरुद्ध हीच लढाई सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचेही ते (Shiv Sena in Andheri East assembly constituency) म्हणाले.



शिवसेनेकडून ऋतुजा लटके -यंदाच्या जूनमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. पती रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने रुताजा लटके यांना उमेदवारी दिली आहे.



भाजपकडून मुरजी पटेल ?दोन वेळा आमदार राहिलेले रमेश लटके यांनी २०१४ साली या जागेवरून काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. या वर्षी 11 मे रोजी दुबई दौऱ्यावर असताना त्यांचे निधन झाले. दुसरीकडे, भाजपकडून या जागेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, काँग्रेसने जाहीर केलेला पाठिंबा शिवसेनेला (Uddhav Thackeray Shiv Sena) फायदेशीर ठरू शकतो, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. कारण, मागील अनेक वर्ष शिवसेनेपासून वंचित राहिलेला बहुजन व अल्पसंख्यांक मतदार काँग्रेसच्या पाठिंबामुळे आता शिवसेनेला मिळणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेतील बहुजन व मुस्लिम मत खरंच शिवसेनेला मिळणार का ? हे पहाणं महत्त्वाचं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details