मुंबई -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांच्या वतीने आज (दि. 24 जानेवारी)रोजी शिवडी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. (BJP agitation against Nana Patole) काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपाहार्र वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर हा दावा करण्याता आल्याचे म्हटले आहे. भाजप युवा (Bjp against Congress State President Nana Patole statement)मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी हा दावा दाखल केला असून या याचिकेवर शिवडी न्यायालयात (दि. 27 जानेवारी)रोजी सुनावणी होणार आहे.
भाजप कार्यकर्त्यांचे राज्यभरात आंदोलन
न्यायालयाने तेजिंदर सिंग तिवाना यांच्या याचिकेवर 28 जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधान हे देशातील घटनात्मक पद आहे आणि या पदाचा अपमान करणे हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आपला निषेध व्यक्त केला आहे.
येथील सिडको येथील वसंतराव नाईक चौकात आंदोलन