महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' पुस्तकातून काँग्रेसची मोदींवर टीका - शिशुपाल

मोदींच्या पापांचा घडा भरला असल्याने देशातील जनता मोदींना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली आहे, अशी भूमिका काँग्रेसने 'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' या पुस्तकातून मांडली आहे.

मोदी पुस्तक

By

Published : Mar 31, 2019, 10:15 AM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या १०० चुकांचे पुस्तक काँग्रेसने प्रसिद्ध करत मोदींसोबत भाजपवर निशाणा साधला आहे. महाभारतातील श्रीकृष्णाच्या भूमिकेत येऊन काँग्रेसने मोदीला शिशुपाल म्हणत त्यांच्या १०० चुका आता पूर्ण झाल्या असल्याचे दाखवले आहे. मोदींच्या पापांचा घडा भरला असल्याने देशातील जनता मोदींना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली आहे, अशी भूमिका काँग्रेसने 'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' या पुस्तकातून मांडली आहे.

'भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका' या पुस्तकाचे काँग्रेसकडून प्रकाशन

काँग्रेसने पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पुस्तकातील तब्बल ९० पेक्षा जास्त पानावर मोदींच्या चुका दाखवण्यात आल्या आहेत. उर्वरित पानांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या या पुस्तिकेमध्ये सुरुवातीला मोदींच्या 'राफेल सौदा अंबानीचा फायदा' असे हेडिंग देऊन राफेलच्या घोटाळ्यावर लक्ष वेधले आहे. नोटाबंदीने देशातील लाखो रोजगार उद्ध्वस्त केले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाभाडे काढले, त्या नोटाबंदीपासून तर जीएसटी विमा कंपन्या आणि मोदींनी जाहीर केलेल्या अनेक योजनांवर मोदींच्या चुकांवर लक्ष वेधण्यात आले आहे.

देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य आधी विषयांसोबतच नियोजन आयोगाने घातलेल्या गोंधळावर बोट ठेवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या काळात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर करण्यात आलेल्या बदनामीची दखल घेण्यात आली आहे. 'नेहरूंच्या बदनामीचा ध्यास मांडला खोटा इतिहास' असे हेडिंग देऊन मोदींना एका कार्टूनच्या माध्यमातून उभे करून आता नेहरू यांच्याबद्दलचा चुकीचा प्रचार भारतीय जनता सहन करणार नाही असा इशाराही यातून देण्यात आला आहे. मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर 'लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण' अशी टीका करण्यात आली आहे.

'झोपी गेला चौकीदार, मोदी चोक्सी झाले फरार' अशी एक हेडिंग देऊन काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे 'मल्याला केले बाय-बाय नक्की बोलणं झालं काय' हे प्रकरण देऊन भाजप आणि मोदींना काँग्रेसने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. एकीकडे यूजीसी सारखी संस्था मोदी सरकार गुंडाळत असतानाच दुसरीकडे मात्र श्रीमंत वर्गासाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा करते असे हे या पुस्तकातून दाखवून देण्यात आले आहे.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून १३ कोटी वृक्षारोपणाचा जो आव आणला गेला त्यात झालेल्या भ्रष्टाचारावर काँग्रेसने या पुस्तिकेत बोट ठेवले आहे. ही कोट्यावधीची रोपटे नेमकी गेली कुठे, असा सवाल केला आहे. तर, दुसरीकडे 'अवनीचे मारेकरी आणि पर्यावरणाचा जप करी' असे प्रकरण देऊन मुनगंटीवार पुन्हा धारेवर धरले आहे. पुस्तिकेचा शेवट संभाजी भिडे यांच्या प्रकरणाने करण्यात आला असून मोदी त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन वाचवता येत असे एक कार्टून दाखवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details