महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हार्दिक पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट; अनेक विषयांवर चर्चा - Hardik Patel and Sharad Pawar meet

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. जवळपास पंचवीस मिनिटे चाललेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

mumbai
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 11, 2021, 8:45 PM IST

मुंबई - काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. जवळपास पंचवीस मिनिटे चाललेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण आणि गुजरातमधील महानगरपालिकेचे निवडणूक निकाल यासह अनेक विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा -बँक कर्मचारी संघटनांचा संपाचा इशारा: चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता

या विषयांवर झाली चर्चा

काही दिवस आधी गुजरातमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश आले होते. निवडणुकांच्या वेळी काँग्रेसने हार्दिक पटेल यांची सभा घेतली नाही. तसेच कोणत्याच नेत्यांनी हार्दिक पटेल यांना प्रचारासाठी देखील बोलवले नाही. यासंबंधीची उघड नाराजी हार्दिक पटेल यांनी शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवली. तसेच दादरा- नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणावर देखील या भेटीदरम्यान चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा -धक्कादायक! मळणी मशीनमध्ये साडीचा पदर अडकून महिला ठार

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा तपास महाराष्ट्र एटीएस करणार आहे. हे समजल्यानंतर हार्दिक पटेल यांनी ट्विट करून या निर्णयाचे स्वागत केले होते. तसेच सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी इतर राज्यांनी देखील आपले मत नोंदवावे असे पत्र पाठवलेले आहे. हार्दिक पटेल हेदेखील पटेलांना आरक्षण मिळावे यासाठी आधीपासूनच आग्रही आहेत. त्यामुळे आरक्षण विषयावर देखील या भेटीदरम्यान चर्चा झाली आल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्र्यानी कणा दाखवून एमपीएससी परीक्षा घ्याव्यात - प्रकाश आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details