मुंबई - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाली असून, अजून आज (शनिवार) पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
'शिवसेनेसोबतची चर्चा सकारात्मक; आजही बैठका होणार - काँग्रेस न्यूज
दरम्यान, मागील दोन दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठका झाल्या होत्या. यानंतर आघाडीचे सर्व नेते आज मुंबईत दाखल झाले असून लगेच आघाडीची शिवसेनेसोबत बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेसह आघाडीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद
हेही वाचा -अगोदर महा 'शिव' आघाडी..आता महा 'विकास' आघाडी...
दरम्यान, मागील दोन दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठका झाल्या होत्या. यानंतर आघाडीचे सर्व नेते आज मुंबईत दाखल झाले असून लगेच आघाडीची शिवसेनेसोबत बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेसह आघाडीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेनेसोबतची चर्चा सकारात्मक झाली असून उद्या अजून चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Last Updated : Nov 23, 2019, 4:51 AM IST