मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याची टीका केली. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आज राज्यात काँग्रेसचे आंदोलन सुरू ( Congress agitation in the state ) आहे. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राबद्दल केलेले वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. तर पाच राज्यात केलेल्या प्रचारातून कोरोना हा मोठ्या प्रमाणात वाढला अशी टीका ( Congress leader Criticism PM Naredra Modi ) त्यांनी केली आहे.
Nana Patole Criticism PM : पंतप्रधानांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात राज्यात काँग्रेसचे आंदोलन ; नाना पटोलेंची टीका - Congress state president's Mumbai agitation
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याची टीका केली. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आज राज्यात काँग्रेसचे आंदोलन सुरू ( Congress agitation in the state ) आहे. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राबद्दल केलेले वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. तर पाच राज्यात केलेल्या प्रचारातून कोरोना हा मोठ्या प्रमाणात वाढला अशी टीका ( Congress leader Criticism PM Naredra Modi ) त्यांनी केली आहे.
पंतप्रधान म्हणाले होते?
कोरोना वैश्विक महामारी आहे, आज भारत सुमारे 100 टक्के नागरिकांना पहिला डोस तर 80 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्याचे काम पुर्ण करत आहोत पण त्यातही राजकारण केले गेले. कोरोना काळात काॅंगेसने तर हद्द केली, मुंबईतील गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांना आपआपल्या राज्यात पाठवले आणि बिहार-उत्तर प्रदेशसह देशभरात कोरोना पसरवला. सगळीकडे आफरातफरी पसरवली. दिल्ली सरकारने तर गल्ली बोळात भोंगे फिरवुन लोकांना वापस पाठवले आणि कोरोना पसरवला. कोरोना मोदीच्या प्रतिमेला धक्का बसवेल यासाठी वाट पाहत होते, अशी टीका पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती.