महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूकीच्या तरखेत केला बदल - collector office change

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक तारखांमध्ये बदल झाला आहे. हा बदल चूकून झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले आहे

केंद्रीय निवडणूक आयोग

By

Published : Mar 19, 2019, 10:26 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. मात्र या तारखांत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने बदल केला. हा बदल चुकून झाला असल्याचे स्पष्टीकरणही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले.

केंद्रीय निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात ४ टप्प्यात होणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६ मतदार संघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानापूर्वी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्याकडून पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात २० एप्रिलला मतदान होणार असल्याचे म्हटले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पत्र पाठवण्यात आली आहेत. त्यामधील फक्त चेंबूर विभागात चुकून २० तारखेला मतदान असल्याचे म्हटले आहे. सदर पत्र बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला समज देण्यात आली आहे. हे पत्र पुन्हा पाठवून चूक सुधारली जात असल्याचे कुर्वे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details