महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सहकार्य करा, राजकीय पोळ्या भाजू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सहकार्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी गंभीर असून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सहकार्य करा, राजकीय पोळ्या भाजू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
सहकार्य करा, राजकीय पोळ्या भाजू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

By

Published : Nov 10, 2021, 2:10 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सहकार्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी गंभीर असून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावरून एसटी कर्मचारी संपावर आहे. एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांना मात्र मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.


मुख्यमंत्र्यांचे आवाहन
"एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे."

राजकीय पक्षांना आवाहन

"राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या." असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details