मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा आज घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत मुंबई महापालिका हद्दीतील कोरोनाची स्थिती आणि महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.
राज्यात कोरोनाचा उद्रेक
मुंबईसह राज्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. राज्यात मागील 24 तासांत 61 हजार 695 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे तर 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 53 हजार 335 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 36 लाख 39 हजार 855 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
59 हजार 153 जणांचा मृत्यूआज राज्यात 349 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 59 हजार 153 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.63 टक्के इतका झाला आहे.6 लाखांहून अधिक सक्रिय रुग्णराज्यात 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. 29 लाख 59 हजार 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे.राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
कुठे किती रुग्ण?
मुंबई महानगरपालिका - 8 हजार 209
ठाणे- 1 हजार 24
ठाणे महानगरपालिका- 1 हजार 597
नवी मुंबई-1 हजार 184
कल्याण डोंबिवली- 1 हजार 611
उल्हासनगर-198
मीराभाईंदर-485
पालघर-483
वसई विरार महानगरपालिका-567
रायगड-793
पनवेल महानगरपालिका-677
नाशिक-1 हजार 592
नाशिक महानगरपालिका-3 हजार 235
अहमदनगर-2 हजार 264
अहमदनगर महानगरपालिका-713
धुळे- 292
धुळे महानगरपालिका-228
जळगाव-703
जळगाव महानगरपालिका-153
नंदुरबार-387
पुणे- 2 हजार 455
पुणे महानगरपालिका- 5 हजार 469
पिंपरी चिंचवड- 2 हजार 37
सोलापूर- 762