महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 3, 2021, 8:00 AM IST

ETV Bharat / city

कोविड काळात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक!

कोविड काळात देखील स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणार्‍या सफाई मित्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. स्वच्छतेचे काम गांभीर्याने पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांचा देखील सन्मान करीत आहोत ही त्यांचं मनोबल वाढवणारी गोष्ट आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोविड काळात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक!
कोविड काळात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक!

मुंबई : कोविड काळात देखील स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडणार्‍या सफाई मित्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखील साजरा करीत आहोत. हे औचित्य दाखवून आपण स्वच्छतेचे काम गांभीर्याने पार पाडणाऱ्या फ्रंट लाईनर्स सफाई मित्रांचा देखील सन्मान करीत आहोत ही त्यांचं मनोबल वाढवणारी गोष्ट आहे.

कोविड लढाईमध्ये त्यांचा मोठा सहभाग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांपासून या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत देखील सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने तसेच जबाबदारीने पार पाडले हे प्रशंसनीय आहे. नगर विकास विभागाने त्यांचे कौतुक करायचे ठरवले ते उचित आहे. अशा कर्मचाऱ्यांमुळे स्वच्छतेला प्रोत्साहन मिळते आणि शहराचे तसेच नागरिकांचे आरोग्य ठीक राहण्यास मदत होते. या सफाई मित्रांचे कौतुक करावे तितके कमी आहे. कोविड विरुद्धच्या लढाईमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


विविध भागात स्वछता अभियान
देशातील सर्व नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे महात्मा गांधी यांचे मत होते. आपल्याला महात्मा गांधी यांच्या जीवनातून, कार्यपद्धतीतून, आचार-विचारांतून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. गांधीजींच्या विचाराने भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या विचारातून केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक महान संदेश दिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागात स्वछता अभियान राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -निसर्गाचे वरदान जपणे आपले आद्य कर्तव्य - उद्धव ठाकरे

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details