महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cm Thackeray On Anil Avchat : डॉ. अनिल अवचट बहुआयामी व्यक्तिमत्त्व, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

डॉ. अनिल अवचट यांचे आज निधन झाले ( Anil Avchat Passed Away ) आहे. त्यावेळी ते 78 वर्षाचे होते. चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली ( Cm Thackeray On Anil Avchat ) आहे.

Anil Avchat
Anil Avchat

By

Published : Jan 27, 2022, 2:57 PM IST

मुंबई - साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणे क्लेशदायक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डॉ. अनिल अवचट यांच्या निधानाबद्दल ( Cm Thackeray On Anil Avchat ) भावना व्यक्त केल्या.

डॉ. अवचट यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवासात आपल्या अनोख्या लेखनशैलीची महत्वपूर्ण अशी भर घातली. त्याचबरोबरीने त्यांनी सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळीतही हिरीरीने सहभाग घेतला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी संस्थात्मक आणि भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी श्रद्धांजली उद्धव ठाकरे यांनी वाहिली.

अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.

हेही वाचा -Anil Avchat Passed Away : ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details