मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे देखील उपस्थित होते. या भेटीवेळी राज्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यात असलेली कोरोना परिस्थिती, राज्यात आलेली पूर परिस्थिती आणि राज्यात धरणात असलेला पाणीसाठा या सर्व संदर्भात राज्यपालांनी माहिती घेतली. तसेच बारा राज्यपाल नामनिर्देशित सदस्य या मुद्द्यांवर राज्यपालांनी चर्चा झाली. मंत्रिमंडळाने सूचित केलेल्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, याबाबत आज पुन्हा एकदा राज्यपालांना विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
राज्यपाल नियुक्त 12 सदस्याबाबत चर्चा करत असताना राज्य सरकारने सुचवलेल्या बारा नावांपैकी कोणत्याही नावाला राज्यपालांनी आक्षेप घेतलेला नाही. त्या बारा आमदारांना नियुक्त करण्याबाबत सर्वस्वी अधिकार राज्यपालांचा आहे. मात्र आता बराच वेळ झाला असल्याने राज्यपालांनी तो निर्णय लवकर घ्यावा, अशी विनंती आज पुन्हा केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या सर्व चर्चा झाल्यानंतर राज्यपालांनी बारा सदस्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल आहे.
हे ही वाचा -Manike Mage Hithe: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी गायिका आहे तरी कोण?, नेटीझन्सना भुरळ, बिग बीही फॅन
जनआशीर्वाद संपताच आघाडीच्या नेत्यांना नोटीस -
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा संपताच आघाडीमधील नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस आली. आज त्यांना हजर राहण्यास संदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे ते आज जाऊ शकले नाही. पण केंद्रीय तपास यंत्रणेला नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे यावेळी अजित पवारांनी सांगितले. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्यावर सीबीआयने कारवाई केल्या संदर्भात आपल्याला माहिती नसल्याचंही यावेळी अजित पवारांनी सांगितले.
हे ही वाचा -खळबळजनक.. परभणीत सावकारांच्या जाचाला कंटाळून दोन तरुणांची आत्महत्या
ऑक्टोबर २०२० ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १२ नावे मंजूर करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली होती. मंत्रिमंडळाने नामनिर्देशित केलेली नावे खालीलप्रमाणे -