मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130वी जयंती आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री नागपूर दीक्षाभूमी येथेही जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची जयंतीची साध्या पद्धतीने साजरी होत आहे. गेल्या वर्षी देखील आंबेडकर अनुयायांना साध्या पद्धतीने जयंती साजरी करावी लागली होती. राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने देखील घरीच आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. बाबासाहेबांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. असे मुख्यमंत्री आणि जयंतीच्या नियोजन कार्यक्रमात सांगितले होते.
चैत्यभूमीवर शांतता..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखो अनुयायी देशभरातून अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्यांना येथे बंदी करण्यात आली आहे. यामुळे दरवर्षी गजबज असणाऱ्या परिसरात यावेळी मात्र शांतता आहे. घरच्या घरी ऑनलाईन सेवेचा वापर करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा असे आव्हान पालिकेकडून करण्यात आले आहे.