महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरे वृक्षतोड : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती.

Aarey
आरे जंगल संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 30, 2020, 9:02 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी आंदोलन केले होते. त्या दरम्यान अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details