मुंबई -काल महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, या सरकारमध्ये मी सामील होणार नाही, असे सांगणारे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी काही वेळातच आपला शब्द बदलत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या कारणास्तव ह्या राजकीय घडामोडीची चर्चा सर्वत्र रंगली असताना याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहाखातरच देवेंद्र फडवणीस यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फार मोठं मन करून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आहे असेही ते म्हणाले.
आम्ही हिंदुत्वाशी एकनिष्ठ - या प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, एका मोठ्या राजकीय परिवर्तनानंतर याचा सर्वांना धक्का बसला. त्याच स्पष्टीकरण मी आज करत आहे. हिंदुत्वाच्या आधारे भारतीय जन संघाची स्थापना झाली. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. हिंदुत्व ज्यांनी मानलं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून काहीजण बसले. म्हणून यांचा विरोध जो होता तो विकासासाठी व हिंदुत्वासाठी होता. आम्ही राम मंदिरासाठी जो निधी दिला त्यावर ही टीका केली. महाविकास आघाडी सरकारने अजाणला विरोध केला. मेट्रोला विरोध, एस टी कमर्माचारी आंदोलन चिरडून टाकले. मराठा, ओ बी सी, धनगर आरक्षण नाकाम केले. असा आरोप पाटील यांनी केला.