महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

cm eknath shinde statement बेस्टला लागेल ती मदत राज्य सरकार करेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लेटेस्ट न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत दुमजली इलेक्ट्रिक एसी बस व प्रीमियम बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बेस्टला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने आता ट्रिपल डेकर पूल बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा. या पुलावरून वाहने आणि मेट्रो सुरू करावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

Electric AC Double Decker Bus Launched In Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

By

Published : Aug 18, 2022, 10:37 PM IST

मुंबई - आम्ही जशी क्रांती केली आहे तशीच क्रांती गेल्या ७५ वर्षात बेस्टने केली आहे. बेस्टने best bus corporation आपल्यात अनेक बदल घडवले आहेत. यापुढे बेस्टला लागेल ती मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm eknath shinde यांनी आश्वासन दिले आहे. बेस्टचे विलीनीकरण करण्यासाठीही सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सरकार state government, मुंबई महापालिका mumbai corporation आणि बेस्टने पुढाकार घ्यावा अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी union minister nitin gadkari यांनी केली.

कर्मचाऱ्यांना थकबाकी द्याबेस्ट उपक्रमाच्या best bus corporation अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दुमजली इलेक्ट्रिक एसी बस व प्रीमियम बसचे लोकार्पण, बेस्ट कॉफी टेबल बुक, बेस्टची अमृत महोत्सवी कथा पुस्तकाचे प्रकाशन, स्वयंचलित मार्गप्रकाश व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री गिरीश महाजन, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांची ४५० कोटी रुपयांची थकबाकीयावेळी बोलताना, बेस्टच्या best bus corporation कर्मचाऱ्यांची ४५० कोटी रुपयांची थकबाकी देणे आहे. ही रक्कम पालिकेने बेस्टला द्यावी. गणपती पूर्वी ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल, अशी व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी cm eknath shinde पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना दिले. बेस्टकडून १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना पास दिले जातात. त्यापुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पास दिले जात नाहीत. त्यांनाही पास देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बेस्टला दिले. कर्मचाऱ्यांना आणखी काय हवे, असे विचारल्यावर बेस्टचे विलिनीकरण असे कर्मचारी बोलताच तोही प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी सकारात्मकता मुख्यमंत्र्यांनी cm eknath shinde दर्शवली.

पूल बांधताना चूक झाली मुंबईत ५५ पुल बांधले. त्यानंतरही ट्रॅफिक आहे, तसेच आहे. त्यावेळी पूल बांधताना माझी चूक झाली. डबल ट्रिपल डेकर पूल बांधायला हवे होते. मुंबई महापालिका mumbai corporation आणि राज्य सरकारने आता ट्रिपल डेकर पूल बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा. या पुलावरून वाहने आणि मेट्रो सुरू करावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी union minister nitin gadkari यांनी केली. बेस्टने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी नवी मुंबई विमान तळापर्यंत जाण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करावी अशा सूचनाही त्यांनी केली.

मुंबई प्रदूषण मुक्त होईलदूषित पाण्यावर एनर्जी करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा. दूषित पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करावे. पुढील काळात डिझेल पेट्रोल ऐवजी ग्रीन हायड्रोजन हे इंधन असणार आहे. त्यामुळे मुंबई प्रदूषण मुक्त होईल, असा विश्वास गडकरी union minister nitin gadkari यांनी व्यक्त केला. फ्लेक्स इंजिंनवर चालणारी रिक्षा टॅक्सी आदी वाहने सुरू करण्यासाठी राज्य सरकारने state government पुढाकार घ्यावा, असे आवाहन गडकरी union minister nitin gadkari यांनी केले. येत्या काळात कर्णकर्कश हॉर्नचे आवाज बदलणार आहेत. सुमधुर आवाज असलेले हॉर्न आणून आवजाद्वारे होणारे प्रदूषण बंद होईल, असे गडकरी union minister nitin gadkari म्हणाले.

नरिमन पॉइंट ते दिल्ली १२ तासात नरिमन पॉइंट ते दिल्ली १२ तासात पोहचता येईलस, असा हाय वे तयार करत आहोत. त्यासाठी जी एस टी आणि इतर सूट राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. पाण्यावरून आकाशातून केबल टाकून डबल डेकर सुरू करण्याची योजना सुरू करू असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सोमवारपासून बॅटिंग करणारबेस्ट चांगले काम करत आहे. बेस्टने आपल्यात अमुलाग्र बदल घडवले आहेत. बेस्ट आर्थिक संकटात असल्याने पालिका आर्थिक मदत करत आहे. एकवेळ अशी येईल की बेस्ट पालिकेला आर्थिक मदत करेल असा विश्वास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. बेस्टला मदत करण्याची संधी मुख्यमंत्र्यांना आहे. राज्य सरकारनेही बेस्टला मदत करावी अशी सूचना नार्वेकर यांनी केली. मुख्यमंत्री विधानभवनात चांगली बॅटिंग करतात, मागच्यावेळी दोनच दिवस अधिवेशन होते. त्यामुळे त्यांना जास्त बोलण्याची संधी मिळाली नाही. येत्या सोमवार पासून ती बॅटिंग दिसेल असे नार्वेकर म्हणाले.

हेही वाचा Dahi Handi दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details