मुंबई- घाटकोपर पूर्व येथील आमदार आणि माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता यांच्या 30 वर्षाच्या कार्याचे कौतुक केले.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहता यांच्या कार्याचे कौतुक करीत भाजपने गेल्या पाच वर्षात केलेल्या मुंबईतील विकासकामांचा पाढा वाचला. भाजपने गेल्या पाच वर्षात मुंबई पुनर्विकास आणि दळणवळण या बाबत भरीव काम केले आहे. गेल्या पाच वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा सरकारने बदलला आहे, असे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा - बँक घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'कडून अजित पवारांवर गुन्हा दाखल; शरद पवारांचे नाव नाही