महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'देशातील नागरिकांचे नागरिकत्व नरेंद्र मोदी किंवा राज ठाकरे ठरवू शकणार नाही'

देशातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राज ठाकरे ठरवू शकणार नाही, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि मनसेला प्रत्युत्तर दिले.

Imtiyaz Jaleel
इम्तियाज जलील

By

Published : Jan 27, 2020, 11:46 PM IST

मुंबई - भारत देश संविधानानुसार चालत होता, चालत आहे आणि यापुढेही चालत राहील. मुस्लीमांनी कलम 370 हटवण्याला विरोध केला नाही. मुस्लीमांनी बाबरी मशिदीच्या निकालाला विरोध केला नाही. मात्र, जेव्हा मुस्लिमांना त्यांच्या नागरिकत्वावर प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे षडयंत्र सरकारने रचले, तेव्हा त्या विरोधात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले.

खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा... 'तेव्हा' विरोध नाही केला मग आता का करताय ? अदनान सामी प्रकरणात भाजपची उडी

देशाचे संविधान आमचे प्राण आहे. ते टिकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मुस्लीमच काय तर कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व नरेंद्र मोदी किंवा राज ठाकरे ठरवू शकणार नाही, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि मनसेला प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा... शिवसेनेवर विश्वास नाही, इतकी लाचारी कशी...

जनता मूर्ख नाही. सर्व राजकीय पक्ष स्वार्थासाठी धोरण आणि दिशा बदलत आहेत. एकीकडे मुस्लीम समाजाला इथे पिढ्यान पिढ्या राहुनही पुरावे मागायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानवरून आलेल्यांना सन्मानित करायचे, हे भाजपचे षडयंत्र आहे. असे अदनान सामी याला जाहीर करण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्कारावर बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

हेही वाचा... आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर कोल्हापूरच्या गिर्यारोहकाने फडकवला ७१ फुटांचा तिरंगा

तिरंग्याचा अपमान करणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे समर्थन होणार नाही. पोलीस योग्य ती कारवाई करतीलच. मात्र, तिरंग्याचा अपमान करणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात मी आणि माझा पक्ष असेल. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया उत्फुर्त होती, असे तिरंगा र‌ॅलीबाबतच्या घटनेबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details