मुंबई- चुनाभट्टी बलात्कारप्रकरणी पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नसून धमकावत आहेत. आम्ही तपासात सहकार्य केले. बहिणीचे फोन कॉल्सचे रेकॉर्ड दिले. शिवाय संशयित तरुणांचे फोटोही दिले. तरीदेखील पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दडपण्याचे काम करित आहे. मला व माझ्या कुटुंबावर दबाव आणत असल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. तसेच याप्रकरणी जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत बहिणीवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचेही भावाने मोर्चा संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी पोलिसांचे सहकार्य नाही; तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
आम्ही तपासात सहकार्य आहोत. शिवाय संशयित तरुणांचे फोटोही दिले. तरीदेखील पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दडपण्याचे काम करित आहे. माझ्या कुटुंबावर दबाव आणत असल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. याप्रकरणी जोपर्यंत दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत बहिणीवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे पीडितेच्या भावाने सांगितले.
पोलिसांनी आम्हाला न्याय दिला नाही. पण आमचे जगणे मुश्कील करून टाकले आहेत. माझी बहीण गेली पण न्याय मिळाला नाही. पोलीस मात्र आमच्यावर चौकशीच्या नावाने अन्याय करत आहेत. त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अन्यथा सर्व कुटुंब आत्मदहन करू असा इशारा भावाने सरकारला दिला आहे. लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. पोलीस याप्रकरणाची चौकशी का करत नाहीत. यावर आम्हाला संशय असल्याचेही ते म्हणाले. माझ्या वडिलांची 24 तास चौकशी करतात. माझी पण चौकशी करतात. त्यास आम्ही वैतागून गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांना संशयित आरोपीचे नाव दिले. पोलिसांनी आरोपींना माझ्या बहिणीसमोर जिवंत असताना का घेऊन आले नाहीत. तिच्यापुढे आणले असते तर तिने आरोपींना ओळखले असते. पण पोलिसांनी केवळ वेळकाढूपणा केला. आणि त्यातच माझ्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाला सर्वस्वी पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी निलंबित झाले पाहिजे व या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही बहिणीवर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भुमिका पीडितीच्या भावाने घेतली.