महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बी. आर. शेट्टी हल्लाप्रकरणी 'छोटा राजन'सह 5 जणांना 8 वर्षांची कैद - बी. आर. शेट्टी

2015 साली छोटा राजनला भारतात आणल्यानंतर या प्रकरणात त्याला पाचवा आरोपी बनविण्यात आले होते. खंडणी न दिल्याने शेट्टी यांच्यावर हल्ला करण्याचा इशारा छोटा राजन याने त्याच्या हस्तकांना दिला होता. यासाठी पैसे, हत्यारे, व इतर व्यवस्था छोटा राजन याच्या इशाऱ्यावर करण्यात आली होती.

Chota Rajan sentenced for eight years along with his partners for attempting murder of BR shetty

By

Published : Aug 20, 2019, 6:07 PM IST

मुंबई- हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन 'छोटा राजन' याच्यासह 5 जणांना मकोका न्यायालयाने 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आज झालेल्या सुनावणीत मकोका न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

2013 साली खंडणी न देण्याच्या कारणावरून, मुंबईतील आंबोली परिसरात हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर 2 आरोपींनी गोळीबार केला होता. यात शेट्टी जखमी झाले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करीत, नित्यानंद नायक (कटाची अंमलबजवणी करणारा), सेल्विन डॅनियल (कटाची अंमलबजवणी करणारा) सतीश काल्या - (कट रचणारा), दिलीप उपाध्याय (शूटर) आणि तलविंदर बक्षी (शूटर) या 4 जणांना अटक केली होती.

या संदर्भात 1,332 पानांचे आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. 2015 साली छोटा राजन याला भारतात आणल्यानंतर या प्रकरणात त्याला पाचवा आरोपी बनविण्यात आले होते. खंडणी न दिल्याने, शेट्टी यांच्यावर हल्ला करण्याचा इशारा छोटा राजनने त्याच्या हस्तकांना दिला होता. यासाठी पैसे, हत्यारे, व इतर व्यवस्था छोटा राजन याच्या इशाऱ्यावर करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details