मुंबई- गेल्या काही दिवसांपासून लाऊडस्पीकर ( Loudspeaker ), हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) अशा अनेक कारणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक ( CM Thackeray Meeting with Shiv Sena MPs) बोलावली आहे. केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याची रणनीती या बैठकीत आखली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदूत्वाच्या मुद्यावर आक्रमक होत आहे, त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरेंचे ( CM Uddhav Thackeray ) खासगी निवासस्थान मातोश्री येथे शुक्रवारी दुपारी 1 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्राविरोधात आक्रमक व्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी कोविडसंदर्भात बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बिगर भाजपशासित राज्यात ( Non-BJP states ) इंधनाचे दर जास्त असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र आता केंद्र सरकारला घेरण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात असून केंद्र सरकार सरकारकडे असलेली महाराष्ट्राची थकबाकी, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर ( Petrol and diesel price hike ) यावर चर्चा होणार असून केंद्राविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.